वणवा पेटवणारा तिसरा निखारा विझला!

‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक क्रांती होऊ शकली नाही’, असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते. पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो. दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या. त्यामुळे आपल्या देशात व्होल्टेअर जन्माला येऊ शकला नाही!

अशा शब्दांनी अंगार पेटवणारा दलित पँथरचे ‘महानायक’ राजा ढाले हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. दलित पँथरची स्थापना नेमकी कोणी केली, यावर लेखमाला चालवून वृत्तपत्रांनी 1980 च्या दशकाच्या प्रारंभी  वाद उभा केला होता. पण अत्याचाराविरोधात दलित तरुणांच्या संतापाच्या त्या उद्रेकाला तोंड फोडताना पहिला निर्णय कोणाचा, पहिली बैठक कुठली आणि स्थापनेची घोषणा करणारे पत्रक कोणाचे या गोष्टी नंतर उभ्या राहिलेल्या झंजावातात फिजुल ठरल्या होत्या. कारण राजा ढाले यांनी स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘साधना’ साप्ताहिकातून लिहिलेल्या लेखानेच दलित पँथरचा वणवा खऱ्या अर्थाने पेटवला होता. अन ढाले यांना त्या वनव्याने पँथरचे ‘महानायक’ बनवले होते.

त्या ऐतिहासिक पँथर वणव्याला फैलावणारे धगधगते पाच निखारे होते, राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वि पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर.
भाई संगारे, नामदेव ढसाळ यांच्यानंतर राजा ढाले यांच्या निर्वाणाने तिसरा निखारा विझला आहे.

राजाभाऊंना अखेरचा सॅल्युट आणि विनम्र श्रद्धांजली.

@ दिवाकर शेजवळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *