झोया अख्तर दिग्दर्शित गली बॅाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला. या चित्रपटाने भारतात दमदार कमाई देखील केली. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या अभिनयाचं ही कौतुक झालं. आता या चित्रपटाला दक्षिण कोरियामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दक्षिण कोरियामध्ये २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅटास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये (बीआयएफएएन) या चित्रपटाला ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशियन सिनेमा’हा पुरस्कार मिळाला आहे. एनइटीपीएसीमधील काही सदस्य आणि कलाविश्वातील काही दिग्गज व्यक्ती यांचा समावेश एनइटीपीएसी निवड समितीमध्ये असतात. ही समिती वर्ल्ड फॅटास्टिक ब्लू सेक्शनमधून सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाची निवड करतात. ही निवड करताना नव्या धाटणीचे व आश्यपूर्ण चित्रपटांचा विचार करण्यात येते. यंदा हा पुरस्कार गली बॅाय या चित्रपटाला मिळाला आहे. गली बॅाय या चित्रपट एका तरुण रॅपरवर भाष्य करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *