धावपटू हिमा दासने पोलंड येथे पार पडलेल्या पोन्जान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. हिमा दासने २०० मीटर अंतर फक्त २३.६५ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक जिंकलं आहे. हिमाने टि्वटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिमाच्या नावावर अनेक नॅशनल रेकॅार्ड ही आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पाठीचं दुखणं सुरु होतं. मात्र या स्पर्धेत तिने जोरदार पुनरागमन करत २३.६५ सेकंदांमध्ये २०० मीटर हे अंतर पार केलं.

हिमा दासव्यतिरिक्त भारताची धावपटू व्ही. के.विस्मायाने २३.७५ सेकंदात अंतर पार करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. दुसरीकडे पुरुषांच्या २०० मीटर  स्पर्धेत मोहम्मद अनसने २०.७५ सेकंदाची वेळ घेत तिसरं स्थान मिळवलं. तर ४०० मीटर स्पर्धेत के.एस. जीवन याने कांस्य पदक पटकावलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *