भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. इटलीमध्ये सुरु असलेल्या समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत तीने सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. द्युती चंदने ही 100 मीटर शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द्युतीने 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करत सुवर्णपदक मिळवलं आहे.

यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. या कामगीरीमुळे तिचं प्रचंड कौतुक होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *