लोकलच्या गर्दीनं आज आणखी एक बळी घेतला आहे. डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलमधून एक तरुणी खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. सविता नाईक असं या तरुणीचं नाव आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून या तरुणीचा मृत्यू झाला. सवीता 30 वर्षांची होती. या दुर्घटनेनंतर जीआरपीएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर नेहमीच गर्दी असते. १८ जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल १६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. लोकलमधून पडण्याच्या अनेक घटना मुंबईत घडत असतात. त्यामुळे मुंबईकरांची लाईफ लाइन आता डेट लाइन होत चालली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *