केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडल. या अर्थसंकल्पात त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. आता कर भरताना पॅनकार्डची आवश्यकता नाही. आधार कार्डद्वारेही कर भरता येणार आहे. आपल्या देशात सुमारे 120 कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे आयकर भरताना पॅनकार्ड नसेल तरीही चालेल. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्डशी पॅनकार्ड जोडणं बंधनकारक असल्याचा निर्णय दिला होता. याच पार्श्वभूमीच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे.

आजच्या अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही बदल करण्यात आले नाही. 2 ते 5 कोटींचं वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना 3 टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. त्याचसोबत 7 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना ७ टक्के अतिरिक्त सरचार्ज भरावा लागणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *