२०१९ विषवचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान उपांत्य सामन्यात संपुष्टात आलं. उपांत्य सामन्यात झालेल्या पराभवाला जबाबदार कोण यावरून आता चर्चा सुरू आहेत. निवड समितीने चुकीचा संघ निवडल्याची टीका होत आहे. परंतु भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिनेश कार्तिकच्या जागेवर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी यायला हवा होता. धोनी जर चौथ्या क्रमांकावर आला असता तर रिषभ पंतला कसं खेळावं याचा सल्ला त्याने दिला असता. कार्तिक आणि पांड्या हे अखेरच्या फळीत जडेजासोबत योग्य ठरले असते. परंतु यावेळी प्रशिक्षक रवी शास्त्री नेमका कोणता विचार करत होते हे मला माहीत नाही. मात्र, त्यांची ही सर्वात मोठी चूक ठरली आहे, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *