उन्नावमधील बलात्कार पीडित तरुणीचा अपघात झाला आहे. या अपघातात पीडित तरुणीच्या नातेवाईकांचा जागीच मृत्यू झाला असून पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले आहेत. पीडित तरुणीवर लखनऊ मधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये उपचार सुरू आहेत. भाजप आमदार कुलदीप सेंगरवर पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे पीडित तरुणीला मारण्यासाठी हा अपघात घडवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

पीडित तरुणीची कार रायबरेलीमधील गुरबख्श गंज भागात पोहोचताच समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. कारला धडक देणाऱ्या ट्रकचा नंबर आधीच काळ्या रंगाने पुसला होता. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. मात्र, त्यावेळी चालक फरार झाला होता. पोलिसांनी काही वेळातच चालक आणि ट्रक मालकाला अटक केली आहे. परंतु अद्यापही या घटनेबाबत एफआयआर दाखल केली गेली नाही आहे.

पीडित तरुणीला देण्यात आली होती धमकी

पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला भाजप आमदार कुलदीप सेंगरविरुद्ध खटला मागे घेण्यासाठी धमकावण्यात आलं होतं. यामुळे पीडित तरुणी दिल्लीला राहत होती. गेल्या २० जुलैला सीबीआयला निवेदन देण्यासाठी गावी आली होती.

काय आहे उन्नाव प्रकरण?

● १६ वर्षांच्या पीडित तरुणीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री    योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर न्याय मिळण्यासाठी प्रदर्शन केलं होतं.
● २०१७ मध्ये नोकरीसाठी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
● घटनेच्या एक वर्षानंतर एप्रिल २०१८ मध्ये तरुणीने मुख्यमंत्री योगी यांच्या घराबाहेर न्याय मिळत नसल्याची नैराश्यातून आग लावण्याचा प्रयत्न केला होता.
● त्यानंतर आमदार कुलदीप सेंगर वर एफआयआर दाखल करत अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *