
‘कॅफे कॅाफी डे’ या सुप्रसिध्द ब्रॅडचे संस्थापक व्ही.जी.सिद्धार्थ हे गायब झाले आहेत. सोमवारी मंगळुरु येथील नेत्रावती नदीच्या पुलावर सिद्धार्थ यांनी गाडी थांबवली. आणि ते खाली उतरले, ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असं सांगितलं. तेव्हापासूनच ते बेपत्ता आहेत. सिद्धार्थ यांचा शोध सुरु आहे. दरम्यान त्यांच पत्र सापडलेलं आहे.
सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना एक पत्र लिहिलेलं आहे. व्यवसायातील अपयश आणि आर्थिक संकटाविषयी सिद्धार्थ यांनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यांनी या पत्रामध्ये कर्जाचा दबावाचा देखील उल्लेख केला आहे. ‘मी लढलो पण आज मी हार मानली आहे.’ माजी आयकर अधिकाऱ्याने आपला छळ केल्याचही सिद्धार्थ यांनी नमूद केलं आहे.
कोण आहेत व्ही.जी.सिद्धार्थ?
व्ही.जी.सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई आहेत. ‘CCD’हे ब्रॅड संपूर्ण भारतात ओळखीचं आहे. या उद्योगाने सुमारे ३०,००० रोजगारांची निर्मिती केली आहे.