उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये मदरशात शिकत असणाऱ्या  अल्पवयीन विद्यार्थ्यांना जबरदस्तीने जय श्रीराम बोलायला लावत मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत. आरोपी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.

उन्नावमधील दार-उल-उलूम फियाज-ए-आम नावाच्या मदरशात शिकणारे १२ ते १४ वर्षांचे विद्यार्थी मैदानावर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलांवर दमदाटी करत जय श्रीराम बोलायला सांगितलं. मात्र, असं बोलायला मुलांनी नकार दिला. यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना बॅट आणि स्टंपने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची चौकशी सुरू असून तीन आरोपींची ओळख पटली आहे. मदरशाच्या इमामने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *