मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील खाद्यपदार्थाच्या स्टाॅल संदर्भात मध्य रेल्वेने महत्वपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. ‘नो बिल, नो पेमेंट’ या उपक्रमाच्या मार्फत पावती घेतल्याशिवाय ग्राहकांनी पैसे देऊ नयेत, असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आता खाद्यपदार्थ व वस्तूच्या खरेदीचे बिल ग्राहकाना देणे बंधनकारक आहे. मध्य रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांकडून घेण्यात आलेली वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमामुळे निश्चित दरांपेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या स्टॉलधारकांवर मोठी कारवाई होणार आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात केली जात आहे.  प्रत्येक स्टॉलवर ‘नो बिल, फूड फ्री’ असं फलक लावण्याची सक्ती विक्रेत्यांना केली आहे. पावती दिली नाही, तर संबंधित विक्रेत्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *