हातात दारुची बाटली दुसऱ्या हातात बंदुका आणि शिवीगाळ करत फिल्मी गाण्यावर थिरकण्याचा व्हिडिओ आहे भाजपा आमदाराचा. या व्हिडिओच्या माध्यातून त्यांचा बेभानपणा जनतेसमोर आला आहे. हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. भाजपा आमदारासोबत त्यांचे समर्थकही दिसत आहेत. त्यांचा हा धिंगाणा या व्हिडिओतून दिसत आहे. आमदाराचा हा धिंगाणा समोर आल्यानंतर भाजपानेत्यांची सारवासारव सुरु झाली.

आमदार प्रणव सिंह यांनी आधीही पत्रकारासोबत वाद घातला होता. त्यांनी पत्रकाराला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर भाजपाने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले. या घटनेनंतर आमदार प्रणव सिंह त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियावर आमदाराच्या या कृतीचा तीव्र निषेध होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *