मी आंतरजातीय विवाह केल्याने माझ्या वडिलांकडून मी आणि माझ्या नवऱ्याचा खून होईल अशी तक्रार भाजप आमदाराच्या मुलीने केली आहे. साक्षीने व्हिडिओच्या माध्यातून ही माहिती दिली असून देशभरात ह्या व्हिडिओची चर्चा सुरु आहे. ऑनर किलिंगचं समर्थन करण्याऱ्यांच्या घरातून आता या प्रकारची दाहकता समोर आली आहे.

या व्हिडीओच्या माध्यामातून साक्षी मिश्रा हीने आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. साक्षीचा पती अजितेश कुमार हा दलित आहे. या दोघांना मारण्यासाठी आमदार राजेश मिश्रा यांनी गुंड  देखील पाठवले होते. व्हिडीओच्या माध्यमातून साक्षी म्हणते, मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. जर भविष्यात मला, अजितेश किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं, तर यासाठी माझे वडीस आणि भाऊ जबाबदार असतील. मात्र आमदार राजेश कुमार मिश्रा यांनी मुलीने लावलेल्या आरोपांवर म्हणतात, माझ्या विरोधात प्रसारमाध्यांमध्ये सुरु असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. माझी मुलगी प्रौढ आहे. तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कुणालाही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही. तसंच माझ्या कोणत्याही माणसाने, अथवा माझ्या कुटुंबातील कुणीही तशी धमकी दिलेली नाही. साक्षी आणि तिच्या पतीला सुरक्षा देण्यात यावी, असे निर्देश बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचं बरेलीचे पोलीस उप महानिरीक्षक आर. के. पांडे यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *