अलहाबाद हाय कोर्टाने वाराणसीतुन संसदेत निवडून गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवली आहे. बीएसएफ मधून निलंबित केलेले सैनिक तेज बहादूर यांनी वाराणसीतुन मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नामांकन अर्ज भरला होता. मात्र, अर्जामध्ये चुकीची बातमी दिल्याचं कारण देत निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज रद्द केला होता. याविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत तेज बहादूर यादव यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला नव्हता. कायद्यानुसार त्यांना उत्तर द्यायला २४ तासांचा अवधी द्यायला हवा होता. तो दिला गेला नाही, असं म्हटलं आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी राजनीतीच्या दबावाखाली येऊन तेज बहादुर यांचा अर्ज रद्द केला.  तसंच या सगळ्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे. यावर कोर्टाने मोदींना नोटीस पाठवत २१ ऑगस्ट पर्यंत उत्तर द्यायला सांगितलं आहे. कोर्टाने निवडणूक आयुक्तांसह निवडणूक अधिकारी आणि स्थानिक न्यूज चॅनेल यांना पक्षकार म्हणून हटवलं आहे. कोर्टाने नोंदणीकृत पोस्टाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नोटीस पाठवण्याचा आदेश दिला आहे. तसंच दोन वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करायला सांगितलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *