मॅाब लिंचिंगविरोधात चिंता व्यक्त करत बाॅलिवूडच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं होतं. आता त्या पत्राला विरोध करत, ६१ सेलिब्रिटींनी ‘सिलेक्टिव्ह आउटरेज’ आणि ‘फॉल्स नॅरेटीव्ह्ज’ (‘Against Selective Outrage and False Narratives’)असं पत्र लिहिलं आहे. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री कंगना रनौत, निर्माते मधुर भंडारकार, पं. विश्व मोहन भट्ट, विवेक अग्निहोत्री, शास्त्रीय नृत्यांगना आणि खासदार सोनल मानसिंह, यांचा समावेश आहे.

या पत्राच्या माध्यातून ४९ दिग्गजांना सवाल केला आहे की, जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावादी लोक शाळा बंद ठेवतात तेव्हा कुठे गेला होता? जेव्हा नक्षलवादी हल्ल्यात आदिवासी आणि गरिब मारले जातात, तेव्हा हे सर्व गप्प असतात. काही ठराविक बाबींवर चिंता करण्याच्या त्यांच्या वृत्तीवर टीकाही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *