@सुरेश खोपडे

मा .फडनविसजी यांनी सादर केलेले योग शास्त्र किती शास्त्रीय किती प्रचारकी अश्या आशयाची माझी पोस्ट फेसबुक वर आल्यावर “तुम्हाला काही सकारात्मक दिसते की नाहीच”, असे शेरे मिळाले. हटयोगी  गुरुजी कडून मी योग शिकलो. आठवड्यातून 3/4 वेळा इतर व्यायामा बरोबर करतो. कॅन्सरसह अनेक आजार योग मुळे बरे होतात हे सांगून रामदेव बाबाने योगाला बदनाम केले. योग विद्येतील शरीरातील कुंडलिनी, चक्र आजपर्यंत सर्जनला का दिसली नाहीत या प्रश्नाने हिपोक्रट्स पासून सर्व धन्वंतरीनां अचंबित केलेय. योगात भव्य दिव्य काहीही नाही. स्ट्रेचिंग व फिसीओथेरपी मधील हॅपी हार्मोन्स तयार करणारा एक बाळबोध व्यायाम आहे. शेताला एक फेरफटका मारला तर त्या पेक्षा जास्त फायदा होतो. तो एक व्हाइट कॉलर सुखवस्तूंचे गेट टू गेदरचे कर्मकांड आहे.

योग हे कृषी संस्कृतीतील श्रमाला तुच्छ लेखणारे/घृणा निर्माण करणारे आहे. खेडेगावात मजूर मिळत नाहीत, तरुणांना मातीत हात घालायला कमीपणा वाटतोय. उच्च वर्णीयांचे अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला ब्राह्मणायझेशन/संस्कृतायझेशन म्हणतात. आम्ही तमाम शूद्र त्या प्रक्रिये मागे आहोत तर ‘ते’ पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात!

चीन मी पाहिला. अभ्यासला. आपल्या नंतर 2 वर्षांनी स्वतंत्र झालेला, किडे मकुडे खाणारा देश कुठे गेलाय! त्यांनी एक केलं, सांस्कृतिक क्रांती केली. जुने फेकून दिले. जुनाटांना अद्दल घडविली. नवे विचार, नव्या कल्पना राबवल्या. इस्रायलने तेच केलं.

इथं, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला, घरी कर्मकांड करीत बसलेल्या असतात. बाहेर जय श्रीराम किंवा नारे तकदिर अल्ला ओ अकबर म्हणत एकमेकांकडे त्वेषाने पाहणारे पुरुष  व त्या महिला हातात टिकाव व फावडे घेऊन  बाहेर पडले तर योगासन व नमाजा पेक्षा जास्त आनंद मिळेल. हे सांगण्याचा मला नैतिक अधिकार असा कि, निवृत्ती नंतर मी सहा एकर शेताला 10 महिने पुरेल एवढा पाणी पुरविण्याचा rain water हार्वेस्टिंग चा प्रयोग केलाय. नोकरीत असताना एस आर पी ग्रुप पुणे, पुणे ग्रामीण जिल्हा, सातारा, अकोला या ठिकाणी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन, परिसरात आम्ही श्रमदानातून बागा फुलवल्या. पोलिसांना मातीत हात घालायला लावून मोर्चा घेऊन येणाऱ्या कष्टकऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून दिली. श्रम करताना व्यायाम होतो, गळणाऱ्या घामातून आनंद मिळतो. लावलेलं रोपटं मोठं होत असताना नवं निर्मितीचा आनंद मिळतो हे दाखवून दिलं. एकत्रित काम करताना संघ भावना कशी वाढते हे पहाता आले. पर्यावरण रक्षणास मदत करता येते, बाग काम करने हा तणाव कमी करण्याचा रामबाण उपाय आहे हे पोलीस दलाला दाखवून दिले. म्हणून तर इंग्रजी साहेब स्टेजवर अगर दुसऱ्याच्या बागेत तंगड्या वेड्या वाकड्या करत, कृत्रिम हसत बसण्या ऐवजी बागेत काम करताना दिसतो. गांधीजी म्हणत नवं निर्मिती करणारा शेतकरी हा जगातला आनंदी माणूस असेल.

मोदीजी व फडणवीस यांच्या हिंदुत्वात श्रम करणाराना शूद्राचा दर्जा असून त्याने उच्च वर्णीयांची सेवा करावी असा आदेश आहे तर योग हे सत्वगुणी ब्राह्मण वर्णीयांसाठी आहेत. म्हणूनच टीनोपालने धुतलेले कपडे घालून फडणवीस स्टेजवर योगनृत्य करताना  तर त्यांचे कुटुंबीय झुंबा नृत्य करताना दिसतील. आमच्या गावाकडील भावा बहिणींनी त्यांचे अनुकरण करून भागणार नाही व आनंद ही मिळणार नाही. कुदळ फावडे घेऊन त्यांना गावा भोवतालचे पाणी अडवून जिरवता येईल. परिसर फुल, फळ, औषधी झाडे लावून सुंदर स्वच्छ करता येईल. आधी केले मग सांगितले या उक्ती नुसार मला फडणवीसांच्या नौटंकीतली नकारात्मकता  सांगण्याचा अधिकार आहे. योगाचा संबंध सनातनी विचार ते वर्ण व्यवस्था ते विषमता ते शोषण ते पूर्व जन्मीचे कर्म ते अवतार ते … मोक्ष!
म्हणून योग, यज्ञ ही फडणवीस व मंडळी सोडल्यास इतरा साठी अधोगती कडे नेणारी समाजाची  ‘मेंटल मॉडेल्स’ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *