खासदार उदयन भोसले ईव्हीएम बाबत आक्रमक झाले आहेत. ईव्हीएम मधील मतमोजणीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. यावर खासदार उदयन भोसले  यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलं आहे. काय व्हायचं दे होऊ द्या; मी खासदारकीचा राजीनामा देतो. त्यानंतर निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघाची फेरनिवडणुक बॅलेट पेपरवर घ्यावी.

राज्यातल्या इतर उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बाबत तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात तफावत असल्याचं समोर आलं आहे. तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काहीही बोलत नाही आहे. हा लोकशाहीचा घात आहे. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असेल, तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा?

निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असेल तर त्यांनी देशभरात मतांमध्ये जी तफावत आली त्याबाबत खुलासा करावा. निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असेल तर त्यांनी देशभरात मतांमध्ये जी तफावत आली त्याबाबत खुलासा करावा, असं खासदार उदयन भोसले यांनी म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *