उदयन भोसले चक्रम : रामराजे निंबाळकर कुत्रा

राष्ट्रवादीत वाद विकोपाला

उदयन भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात निरेच्या पाण्यावरून वाद विकोपाला गेला आहे. चक्रम, कुत्रा असे एकमेकांचे जाहीर वाभाडे काढत राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर आणला आहे.

१४ वर्षे बारामती-इंदापुरला जास्त पाणी दिल्याने उदयन भोसलेंनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना निंबाळकरांनी उदयन भोसलेंना स्वयंघोषित छत्रपती, चक्रम असं म्हटलं होतं. तर उदयन भोसलेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू असा इशारा शरद पवारांना दिला होता. निंबाळकरांच्या टिकेमुळे संतप्त झालेल्या उदयन भोसलें समर्थकांनी निंबाळकरांचा पुतळा जाळला.

हा वाद शांत करण्यासाठी शरद पवारांनी दोघांनाही चर्चेसाठी बोलवलं होतं. मात्र शरद पवारांची मध्यस्थीही अपयशी ठरली.

याबाबतची बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच उदयन भोसले तिथून बाहेर पडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना निंबाळकरांचा उल्लेख त्यांनी पिसाळलेला कुत्रा असा केला. मी बैठकीतून बाहेर पडलो नसते तर हे कुत्र मलाही चावलं असतं, अशा शब्दांत उदयनराजेंनी निंबाळकरांवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *