कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारं हे विधेयक तिसऱ्यांदा लोकसभेत मांडण्यात आलं. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आधीच हे विधेयक संसदेत मांडणार असल्याचं सांगितलं होतं.

काँग्रेसने विधेयकाच्या मसुद्याला विरोध केला आहे. हे विधेयक मुस्लिम कुटुंबियांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवला आहे. विधेयकामधील अनेक तरतुदी संविधानाच्या चौकटीत बसत नसल्याचं म्हटलं आहे. यावर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेचं न्यायालय करू नका, असं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *