भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा असा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच भिवंडी शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात आरपीआय (सेक्युलर) पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ऍड किरण चन्ने एका रुग्णाच्या मदतीकरीता रात्री गेले होते. आरोग्य विभागाचे व प्रशासनाचे रुग्णालयाकडे होत असलेले दुर्लक्ष तसंच इंदिरा गांधी रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, एमर्जन्सी पेशंट करीता उपलब्ध नसलेल्या सोई अशा अनेक प्रश्नांवर ऍड किरण चन्ने यांनी आवाज उठवला होता. याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला होता.

सोशल मीडियावर इंदिरागांधी स्मृती रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबतचा व्हिडीओ व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्या नंतर दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विधानभवनात तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार रूपेश म्हात्रे, आरोग्यसेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसचिव डॉ ठोंबरे, अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभाग व ठाणे महानगपालिकेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्णालय दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *