भाजप आणि मोदी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी चौफेर टीका केली आहे. अनेक प्रश्न पवारांनी उपस्थित केले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना तिकीट दिलं जाणं ही गंभीर बाब असून हा लोकशाहीवर हल्ला आहे अशी टीका शरद पवारांनी भाजप व प्रज्ञा सिंह वर केली आहे. राजकारणात आणि समाजकारणामध्ये लोकांच्या प्रश्नांसाठी काढलेले मोर्चे, आंदोलनं या प्रकरणामध्ये लोकांवर खटले असतात. परंतु ज्यांच्यावर खुनाचा आरोप, मालेगाव बॉम्बस्फोट खटला यांसारखे गंभीर खटले असताना त्यांना उमेदवारीची तिकिटे कशी काय दिली जातात? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्टपतींच्या अभिभाषणात बॉम्बस्फोटातील आरोपी आमच्या शेजारी बसणार आहेत, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

शरद पवारांनी प्रज्ञा सिंहसह मोदींवरही टीका केली आहे. विज्ञानाच्या आधारे आधुनिक विचार केला जातो. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान गुहेत जाऊन बसतात. गुहेत बसून मोदींनी काय संदेश दिला आहे? असा टोलाही मोदींना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *