उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी अटक केलेल्या पत्रकाराची तातडीने सुटका करावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या पत्नी जिगीशा अरोरा यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत कनोजिया यांची अटक अवैध व घटनाबाह्य आहे असं म्हटलं होतं.

प्रशांत कनोजिया यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत योगी सरकारला फटकारत, अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे, पण अटकेचे समर्थन करू शकता का? असा सवाल देखील कोर्टाने विचारला आहे. पत्रकाराच्या मताशी आम्ही सहमत नाही परंतु एखाद्या व्यक्तीला थेट तुरुंगात कस काय टाकू शकता? नागरिकांचं स्वातंत्र्य ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. घटनेने या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. तिच्या स्वातंत्र्याशी तडजोड होऊ शकत नाही. पत्रकाराला अटक करून तुम्ही त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे. त्यामुळे त्याची तातडीने मुक्तता करण्यात यावी असा आदेश योगी सरकारला दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पत्रकार प्रशांत यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये एक महिला मिडियासमोर असा दावा करत आहे की, तिने मुख्यमंत्री योगी यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. “इश्क छुपता नही छुपाने से योगीजी” असा कॅप्शन देखील त्यांनी त्या व्हिडिओला दिला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *