मोदी टाळताहेत प्रज्ञा सिंहला

मोदींना भेटण्याचा प्रज्ञाचा सिंहचा आटापिटा

प्रज्ञा सिंह ठाकूर खासदार निवडून आली असली तरी ती भाजपची अडचण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साध्वी प्रज्ञा सिंहला चार हात लांब ठेवत असून प्रज्ञा सिंहला भेटायचं टाळत आहेत. मोदींना भेटण्यासाठी प्रज्ञा सिंह आटापिटा करत आहेत. लोकसभा निवडणूकी दरम्यान प्रज्ञा सिंह यांनी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर भाजप व मोदींची कोंडी झाली होती. यापुढे पक्षशिस्तीचे पालन करेन व पक्षशिस्तीचे अनुकरण करत काम करेन असं त्या म्हणाल्या.

भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानावर चहुबाजूंनी टीका झाल्यावर प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली. त्यानंतर नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर प्रज्ञा सिंह यांना भाजपा नेतृत्त्वाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी प्राज्ञा सिंहची कानउघडणी केली होती. नथुराम गोडसेला देशभक्त ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण प्रज्ञा सिंहला माफ करणार नसल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *