आरएसएसच्या बलात्कारी स्वयंसेवकाला अखेर कोठडीत डांबण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश मधील मदियावन येथे या स्वयंसेवकाने १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी नातेवाईकांकडे गेली होती. तिथे आरोपी धर्मेंद्र कुमार सिंह याने सतत तीन दिवस या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला फोन करून सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी या मुलीला घेऊन मदियावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीला रुग्णालयात दाखल केले असून आरोपीवर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी धर्मेंद्र कुमार सिंह हा वकिल असून आरएसएसचा स्वयंसेवक देखील आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र जनक्षोभामुळे अखेर पोलिसांनी धर्मेंद्र कुमारला अटक केली आहे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *