नाशिकमध्ये मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला आहे. या गोळीबारामध्ये तिथल्या संजू सॅम्युअल या ऑडिटरचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला असून दोघेजण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

नाशिकमधल्या उंटवाडी भागात दरोडेखोरांनी पावणे अकराच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कार्यालयात प्रवेश करताच दमदाटी करायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षकाने सायरन वाजवला म्हणून चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार केला.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *