मनोहर (संभाजी) भिडे आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी पोलीसांनी नाकारली आहे. परंपरागत पद्धतीने चालत आलेल्या दिंड्यांचा क्रम  कायम रहावा, असं मत पालखी सोहळा समितीने मांडलं. त्यानंतर पालखी सोहळा समितीने पोलीसांना पत्र दिलं. या पत्रात समितीने सोहळ्यात कुणीही घुसु नये, अशी मागणी केली होती. या मागणी नंतर पोलीसांनी संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी समोरून चालण्यास मज्जाव केला आहे. तसंच पालखीच्या मागून चालू शकतात असं म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पालखी सोहळ्यात अडथळा आणला होता. फर्ग्युसन रस्त्यावरून पालखी जात असताना संभाजी भिडेचे कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन हातात तलवारी घेऊन चालायला लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर पालखी मार्गात वाद झाला होता. याचा निषेध म्हणून पालखी सोहळा अर्धा तास रोखण्यात आला होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *