वाढत्या उष्म्याने लोक हैराण झाले असुन नागपूरमध्ये गेल्या पाच दिवसात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात नागपूर, अकोला, चंद्रपूर, विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या पाच दिवसांपासून नागपूरमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशापार गेला होता. तापमानाचा पारा उच्चांक गाठत असतानाच मान्सूनही लांबणीवर गेल्याने नागपूरला अजून काही दिवस तप्त उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

देशात बहुतांश ठिकाणी कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने उन्हाचा चटका आणखी वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. केवळ नागपूरमध्ये आतापर्यंत उष्माघाताने ४७ जणांचा जीव गेला आहे.

उष्माघात टाळण्यासाठी उपाय

१. भरपुर पाणी पिणे.
२. सावलीत राहणे.
३. सुती व सैल कपडे घालणे.
४. कडक उन्हात शारिरीक कष्टाची कामे न करणे.
५. कॉफी, दारू,चहा यांचे सेवन न करणे.
६. तिखट तळलेले पदार्थ खाणे टाळा.
७. अंगात ताप भरल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
८. काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू पाणी आवश्य प्या.

 

तापमानवाढ कमी करण्याचे उपाय

१.वैयक्तिक गाड्यांपेक्षा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला प्राधान्य दिलं तर कार्बन     उत्सर्जनाचं प्रमाण कमी होऊ शकतो

२. ऊर्जा वाचवा

३. जास्तीत जास्त झाडे लावावीत.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *