राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच कृषी जमीन अकृषिक केल्याचा ठपकाही धनंजय मुंडेंवर ठेवण्यात आला आहे.

बेलखंडी मठाला इनाम म्हणून दिलेली जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कुठल्यही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. परंतु राजकीय दबाव आणून जमीन खरेदी केल्याचे आरोप याचिकाकर्त्यांनी केले आहेत. तक्रार दाखल करूनसुद्धा तपासी अंमलदारांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने खंडपीठाने त्यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *