भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळणार आहे. ह्या वर्षीच्या विश्वचषकामध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक संघाची अवे किट असावी , असं आयसीसीने सांगितलं होतं. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग निळा असल्यामुळे कोणत्याही एका संघाल अवे किटचा वापर करावा लागणार होता. इंग्लंड हा यजमान असल्यामुळे भारतीय संघाला अवे किटचा वापर करण्यास सांगितलं.

नायके इंडिया या भारतीय संघाच्या पोशाख उत्पादक कंपनीने भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार असल्याची अधिकृत घोषणा केली. खेळाडूंना चपळ हालचाल करायला सोप्प व्हावं म्हणून जर्सीचं वजन कमी करण्यात आलं आहे. सूक्ष्म जाळीदार कापडाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणी करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *