पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला आहे. ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती. इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणं पुरेसं ठरणार नाही आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात असं म्हटलं आहे की, व्हाईट पेपर जारी करत सर्व पक्षांकडून त्यांचं मतं मागवलं पाहिजे. तसच या मुद्द्यावर तज्ञांशी सल्ला मसलत करणंही तितकंच गरजेचं आहे.

‘एक देश एक निवडणूक’ हा संवेदनशील व गंभीर विषय आहे. इतक्या कमी वेळात या विषयाला योग्य तो न्याय मिळणार नाही. यासाठी राज्यघटना तज्ञ, निवडणूक तज्ञ आणि सर्व पक्ष सदस्यांशी चर्चा करण्यासाठी गरज आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *