मालेगाव बॉम्बस्फोटातील चार आरोपींना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. धनसिंग, लोकेश शर्मा, मनोहर नवारीया आणि राजेंद्र चौधरी अशी या चार आरोपींची नावे आहेत. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

खासदार प्रज्ञा सिंह देखील या प्रकरणात आरोपी आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी खटल्यातील सुनावणीला हजेरी लावली होती. त्यावेळी कोर्टाने बॉम्बस्फोटा संदर्भात प्रश्न विचारले असता ‘ मला माहित नाही’, अशी उत्तरे त्यांनी कोर्टाला दिली. प्रज्ञा सिंह या प्रकृतीच्या कारणास्तव जामीनावर आहेत.

८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगाव येथील मशिदी बाहेर हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हुन अधिक जण जखमी झाले होते. २०१३ रोजी पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *