“पाणी नियोजनाचा दुष्काळ हटवा”

सुरगाणा जलपरिषदेत आदिवासी जनतेचा एल्गार!

निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा दिंडोरी भागात सर्व पाडे, गावं, वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी रात्रं दिवस जागून काढत आहेत. महिलांची तसेच लहान मुलामुलींची  पाण्यासाठी होत असलेली जीवघेणी धडपड वेदनादायक असून पाणी नियोजन,पाणी वापर आणि ह्या तालुक्यातील भौगोलिक रचना यांचा अभ्यास करून आजही निसर्ग जपणाऱ्या आदिवासी बांधवाना पाणी नियोजनाच्या दुष्काळामुळे घोर संघर्ष करावा लागत असल्याचा सुर सुरगाणा तालुक्यातील जाहूले या ठिकाणी सुरगाणा,दिंडोरी, पेठ  तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्थ गावातील जनतेने आयोजित केलेल्या जलपरिषदेमध्ये व्यक्त केला गेला.

परिषदेत प्रथम पाणी बचत,पुनर्वापर, नियोजन याबाबद्दलची सामाजिक प्रबोधन गीते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक चे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, शाहू महाराज यांच्या पाणी धोरणावर त्यांनी पोवाड्यातून प्रबोधन केले.  ह्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित  राहून कार्यक्रम यशस्वी केला. मान्यवरांच्या हस्ते जलपूजनाने जलपरिषदेचे सुरूवात केली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात पाण्याच्या समस्येचे निवेदन  देण्यात आलं. सर्व पक्षीय नेते मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन त्यांनी  जलसमस्या सोडविण्याचे आश्वासन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार डाॅ.भारतीताई पवार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जे.पी गावित, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे सचिव  संदिप जाधव  यांनी दिले.  सोशल फोरम टिमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी पाणी समस्येवर उपाय म्हणून भविष्यात नियोजन कशाप्रकारे करता येऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. लोकसहभागातून त्रिसुत्री कार्यक्रम यशस्वी राबविण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. विविध  सेवाभावी संस्था, ग्रामस्थांच्या श्रमदानातून केलेल्या जलप्रकल्पाची माहिती दिली.
पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राकेश दळवी यांच्या प्रयत्नातून जलपरिषदचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतच सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या गावातील पाण्याची समस्या मांडली. वासाळी ता.इगतपूरी येथील सरपंच काशिनाथ कोरडे यांनी जलसमृद्ध गाव करावे याबाबत माहिती दिली. वामन दादा कर्डक प्रतिष्ठानचे शरद शेजवळ  यांनी जलसाक्षरतेवर पोवाडा गायन करून मंत्रमुग्ध केले. रामदास वाघेरे यांनी जलसाक्षरतेवर प्रतिज्ञा घेतली. यावेळी आपुलकी सेवा गृप नाशिक चे अध्यक्ष खंडेराव डावरे, रामदास शिंदे,देविदास कामडी, सामजसेवी शिक्षक  बलराम माचरेकर, योगेश महाले,अरूण सुबर,  विलास अलबाड, विशाल जाधव, ई.आर गावित, रमेश थोरात, यशवंत गावित, तुषार वाघमारे नगरसेवक, दिपक भोये, हनी भोये ,संग्राम घोरपडे सिव्हील इंजिनिअर, जाहूले गावातील सरपंच सुनिल भोये,पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामस्थ व तरूण मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पत्रकार बांधव, हिरामण चौधरी, शाम खैरनार, रतन चौधरी, नाशिक न्यूजचे शेख उपस्थित होते. सुरगाणा तालुक्यातील हस्ते येथील हेमलता गायकवाड हिने नुकतीचे माऊट एवरेस्ट शिखर सर  केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

राकेश दळवी
(संयोजक,जलपरिषद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *