अमेरिकेने ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ यावर अहवाल सादर केला आहे. या अहवालात भारतात होत असलेल्या मॉब लिंचिंगचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालात जगातील अनेक देशांमधील  धर्म स्वातंत्र्याबाबतची परिस्थिती मांडण्यात आली आहे. भारतातील सध्याच्या परिस्थितीचा देखील त्यात उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालात भारतात होत असलेली मॉब लिंचिंग तसंच कथित गोरक्षकांकडून होत असलेली मारहाण आणि सुप्रीम कोर्टात देशातील विविध शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जाला आव्हान देण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या अहवालात मुस्लिम प्रथांवर आणि संस्थांवर परिणाम करणारे निर्णय भारतातील केंद्र आणि राज्य सरकारने घेतले आहेत. मुस्लिम शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जाला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. यामुळे शिक्षक भरतीच्या स्वातंत्र्यावर आणि अभ्यासक्रमासंबंधीचे निर्णय यावर परिणाम होईल, असं म्हटलं आहे. देशातील मुस्लिम नावांच्या शहरांची नावे सुद्धा बदलली जात आहेत. तसंच मुस्लिमांचे भारताच्या इतिहासातील योगदान मिटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यामुळे धार्मिक हिंसाचार, दंगली होत आहेत. धार्मिक तणाव निर्माण होत आहे. स्वयंघोषित गोरक्षकांचे हल्ले थांबवण्यात सरकार उदासीन आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम सध्या जोरात सुरू असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *