आज अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. इंग्लंड मधील साऊथ हँपटन येथे सामना सुरू आहे. भारताने ५० षटकांत २२४ धावा करत २२५ धावांचं आव्हान अफगाणिस्तानला दिलं आहे. अफगाणिस्तानकडून नाबी, नायब यांनी प्रत्येक २ तर मुजीब, आलम, रहमान शहा आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. भारतातर्फे विराट कोहली आणि केदार जाधव या दोघांनी अर्धशतकी खेळी करत २०० धावांचा आकडा पार करण्यात मदत केली.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या स्वरूपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि राहुलने संघाला सावरलं. केदार जाधवने देखील संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं.
भारतीय गोलंदाजांवर आता भारतीय संघाचा विजय अवलंबून आहे. मुख्य गोलंदाज भुवनेश्वर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *