भिवंडीतील अनधिकृत संरक्षण भिंत पाडण्याचे आदेश अवर सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. भिवंडीतील लोनाड येथील सर्व्हे नंबर २३/ब या ठिकाणी गल्फ ऑइल कॉर्पोरेशन ली. मुंबई यांनी आरसीसी स्वरूपाचे संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम केलं आहे. सदरच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी कंपनीने हजारो वृक्षांची कत्तल केली आहे. एकीकडे राज्यशासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा नारा देत राज्यातील नागरिकांना वृक्ष लागवडीचा संदेश देत आहे, तर दुसरीकडे गल्फ ऑइल कॉर्पोरेशन ली. मुंबई यांनी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र या अनधिकृत बांधकामावर लोनाड ग्राम पंचायतीसह एमएमआरडीए विभागाबरोबरच महसूल व वन विभागाने देखील कोणतीही कारवाई केली नसल्याने वृक्षांची कत्तल करणाऱ्या गल्फ ऑइल कॉर्पोरेशन ली. कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर संरक्षक भिंतीचे अनधिकृत बांधकाम त्वरित निष्कशीत करण्यात यावे, अशी तक्रार भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वन व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी ठाणे, तसेच जिल्हा वन अधिकारी, भिवंडी तहसीलदार व पडघा वन विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड येथील सर्व्हे नंबर २३ / ब या ठिकाणी  गल्फ ऑइल कॉर्पोरेशन ली. मुंबई यांच्या नावे ३५ हेक्टर ६४ गुंठे जागा मालकीची आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाकडून २००७ रोजी कंपनीच्या नावे असलेल्या सात बारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये ”केंद्र शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय वनेत्तर कामास बंदी”, अशी नोंद ठेवण्यात आली असून तसा फेरफार देखील नोंदवण्यात आला आहे. मात्र वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता सदर कंपनीने आरसीसी स्वरूपाचे संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम केलं आहे. अनधिकृत संरक्षण भिंत बांधकामाबाबत गल्फ ऑइल कॉर्पोरेशन ली. कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावाअशी लेखी तक्रार शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे यांनी केली होती .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *