उद्या संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालये बंद असणार आहेत. कोलकत्ता मधील डॉक्टरांवरील अमानुष हल्ल्याचा निषेध म्हणून सरकारी रुग्णालये बंद ठेवणार असल्याची घोषणा मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या अध्यक्षा डॉ.कल्याणी डोंगरे यांनी केली आहे. उद्या राज्यातील सरकारी आणि बाह्य रुग्ण विभाग बंद असेल. केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवली जाणार आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना सुरक्षा द्यावी. तसेच हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी मध्यवर्ती मार्ड संघटनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *