महाराष्ट्रातील आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असेल या दाव्यामुळे शिवसेना भांबावलेली असतानाच या प्रकरणात युवासेनेने उडी घेतलेली आहे. आगामी काळात शिवसेना-भाजप अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचा कारभार राहील असा दावा युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावर भाजपची प्रतिक्रिया अजमावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असावा, अशीही चर्चा होत आहे.

विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना-भाजप युतीचा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला निश्चित झालं असल्याचं ट्विट युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी केलं आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीच हा निर्णय घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. जे लोक उपस्थित नव्हते त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी युती तोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने शिवसेना भांबावलेल्या स्थितीत आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे वा इतर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र युवासेनेच्या पदाधिकाऱ्यामार्फत प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांच्या प्रतिक्रियेवर भाजप काय प्रतिक्रिया देते याची प्रतीक्षा शिवसेनेलाही असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *