विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. आज पाकिस्तानची लढत बलाढ्य किविंसोबत आहे. न्यूझलंडने आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना हरवण्याचं पाकिस्तान समोर मोठं आव्हान असणार आहे.

भारताविरुद्ध हरल्या नंतर पाकिस्तानने आपल्या कामगिरीत सुधारणा करत आफ्रिकेला हरवलं आहे. परंतु स्पर्धेत सर्वात खराब क्षेत्ररक्षण पाकिस्तानचं आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षणावर काम करावं लागणार आहे.

न्यूझलंड चांगल्या फॉर्मात आहे. कर्णधार केन विल्यम्सन, रॉस टेलर, मार्टिन गुप्टील, मूनरो यांसारखे फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्टवर सर्व दरोमदार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *