@ प्रतीक पुरोहित

काल 8 वाजता भारत विरूध्द पाकिस्तान मॅच संपली आणि भारताने जबरदस्त विजय मिळवला. आम्ही इंडियन मित्रांनी आमरस खाऊन हा विजय साजरा केला. रात्री हॉस्टेल खाली दोन मित्र माझ्याशी गप्पा मारायला आले. एक क्रिकेट वेडा भारतीय आणि दुसरा क्रिकेट वेडा पाकिस्तानी. हे दोघेही पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होते. मग त्यांचा पोस्ट मॅच analysis सुरू झाला. गेल्या वीस वर्षात झालेल्या मॅच, चॅम्पियन ट्रॉफी , 2015 वर्लडकप , सचिन, इम्रान खान,कोहलीची कॅप्टनशिप , पाकिस्तानी संघाकडे नसलेला  सिरिअस नेस , इत्यादी इत्यादी. हळू हळू क्रिकेट वरुन विषय शिक्षणावर आला. आम्ही तिघेही वेगवेगळ्या विषयात मास्टर्स करत आहोत. आमचा कोर्स पूर्ण होत आलाय आणि सगळेच नोकरीसाठी धडपड करू लागले आहेत त्यात आम्ही तिघेही शैक्षणिक कर्ज काढून शिकायला आलो आहोत. पहिल्यांदाच एकमेकांना भेटलेले माझे हे दोन मित्र क्रिकेट मुळे एवढे एकमेकांशी बोलू लागले की एकमेकांच्या घरची आर्थिक परिस्थिती, त्यांना मिळालेले आजवरचे शिक्षण, घरच्यांचा पाठिंबा हे त्यांना सारखेच वाटू लागले. त्यांचे घरचे प्रश्न, आई वडिलांचे स्वभाव, पालकांचा संघर्ष हे सारे सारखेच दिसू लागले. परदेशामध्ये नोकरी शोधताना घ्यावे लागत असलेले परिश्रम  दोघांना सारखेच दिसू लागले. दोघांपुढील अनिश्चितता सारख्याच होत्या तरीही नकळत दोघे एकमेकांना धीर देत होते. काल रात्री सख्ख्या शेजाऱ्या सारखे ते जवळ जवळ अडीच तास गप्पा मारत होते. रूमवर आल्यावर इंडियन मित्र म्हणाला आधीच ओळख करून दिली असतीस तर छान मैत्री झाली असती. अरे त्याच आणि माझ जगणं सारखच आहे. प्रवास सारखा आहे ( We have a  lot in common) म्हणत तो आपल्या रूमवर निघून गेला.
Post match analysis -people around you face same struggles like you even if its pakistan or India the basic human struggle is common , the sportsmanship you need to tackle this problems is what they are finding in  each other’s
बाकी वर्लडकप तर यावेळी आपलाच आहे यात शंका नाही…

16/06/2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *