उत्तर प्रदेशमधील जातीयता आणि जातीय अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत. सार्वजनिक नळावर पाणी भरलं म्हणून एका दलित महिलेला विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याचा घटना घडली आहे. कौशांबी येथे घटना घडली असून नेहमीप्रमाणे आरोपींना पोलिसांचं संरक्षण आहे. या अमानुष घटनेनंतर सरकार, मीडिया सर्वांनीच डोळे झाक केली आहे. मात्र या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.

त्या महिलेचा मुलगा सरकारी हँडपंपवर पाणी भरण्यास गेला असता तिथल्या स्थानिकांनी त्याला अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात केली. आपल्या मुलाचा बचाव करण्यास गेलेल्या त्याच्या आईला तिथल्या स्थानिक गावगुंडांनी तिला विवस्त्र करत मारहाण केली. याप्रकारानंतर पीडित महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेली असता तिथल्या पोलिसांनी तक्रार करू नये म्हणून तिच्यावर दबाव टाकला. परंतु महिलेने तडजोड करण्यास नकार दिल्याने तिच्यावर खोट्या केसेस टाकत तिलाच अडकवण्याचा प्रयत्न तिथल्या पोलिसांनी केला. यानंतर पीडित महिलेने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *