लैंगिक शोषणाचे आरोप असलेले अभिनेते नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. भ्रष्ट पोलिसांनी या गंभीर प्रकरणातून नाना पाटेकर यांना वाचवलं असल्याचे गंभीर आरोपही तनुश्री दत्ताने केले आहेत. याबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचं तनुश्री दत्ताने जाहीर केलं आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉर्न ओके प्लिज या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रीकरणादरम्यान असभ्य वर्तन केलं होतं. तसच लैंगिक शोषण केलं असल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. नाना पाटेकरांसह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी, राकेश सारंग यांच्या विरोधातही तनुश्रीने तक्रार दाखल केली होती. २००८ मध्ये हा सगळा प्रकार घडला असल्याचं तिने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *