मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तार १४ जून ला होणार आहे. अनेक दिवसांपासून होत असलेल्या मंत्रमंडळ विस्ताराच्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदला संदर्भात चर्चा केली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा विधानसभा अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल अस म्हटलं होतं. तसेच रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाचीही निवड होणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *