आर्थिक पाहणी अहवाला बोगस असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पाहणी अहवालातली आकडेवारी खोटी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ यांसारखे महत्त्वाचे प्रश्न असताना सरकार वेगळ्याच गोष्टी समोर आणत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. या विरोधात विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी घोषणाही दिल्या. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. काल ज्या पद्धतीने विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं होतं त्याच पद्धतीने आजही आर्थिक अहवालातले आकडे बोगस आहेत असं सांगत विरोधकांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नसून हे सरकार आकडेवारी मांडण्यातच धन्यता मानत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *