पश्चिम बंगाल मधील भाजप आणि तृणमूल काँग्रेस मधील वादाने हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. या हिंसेमुळेच बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजप नेता कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे.

परगणा येथील पक्षाचे झेंडे लावण्यावरून झालेल्या वादानंतर भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारावरून भाजप आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात भाजपने १२ तासांच्या बंदची हाक दिली आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा गृहखात्याने अहवाल मागितला होता. अहवाल देण्यासाठी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. तर सत्ता काबीज करण्याची भाजपची ही चाल आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *