अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानातील १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. भारतीय हवाई दलाचे विमान ३ जूनपासून बेपत्ता होते. या बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष अरुणाचल मधील सियांग जिल्ह्यात आढळले. हे विमान फार उंचावर आणि घनदाट जंगलामध्ये होतं. १५ सदस्यांच्या बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषापर्यंत नेण्यात आलं. शोध पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता.

३ जून रोजी वायुसेनेच्या एएन – ३२ विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात १३ जण होते. ८ क्रु मेम्बर्सचा देखील त्यात समावेश होता. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे हे विमान जाणार होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *