दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रियंका गांधी यांच्या प्रचारामध्ये काही लहान मुलं घोषणा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात असलेल्या या घोषणा वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने नोटीस पाठवली आहे. यामुळे प्रियंका गांधी अडचणीत येणार की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने अनेक प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत. या लहान मुलांना प्रचारात घोषणा द्यायला कोणी शिकवलं ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरण्यास कोणी सांगितलं ?… ही मुलं कोण आहेत त्यांची नावं काय ? ती कुठं राहतात याचा तपशील आयोगाने मागवला आहे. हि सर्व माहिती तीन दिवसांच्या आत सादर करायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *