नवी दिल्ली । इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा आज बीसीसीआयने केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यांची टीम विश्वचषकासाठी खेळणार. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा केली. आयसीसीने खेळाडूंची निवड करण्यासाठी सर्व देशांच्या क्रिकेट बोर्डांना २३ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.

जूनच्या ३० तारखेला इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी भारताने १५ खेळाडूंची निवड केली आहे. विश्वचषकासाठी दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत दोघांच्या नावाची चर्चा होती. अखेर दिनेश कार्तिक याला संघात स्थान मिळाले आहे. आतापर्यंत न्यूझीलंड, अफगाणिस्ताननंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केले आहेत.

२०१९च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *