अमळनेर(जि. जळगाव) भाजप-शिवसेना महायुतीच्या मेळाव्यात बुधवारी घमासान राडा झाला. आपल्याच पक्षाचे माजी आमदार डॉ. बी. एस.पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली. या साऱ्या गदारोळात डॉ. बी. एस.पाटील यांच्या रक्षणार्थ मध्ये पडलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

अमळनेर येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता भाजप उमेदवार आ. उन्मेश पाटील यांची प्रचारसभेदरम्यान हा प्रकार घडला. स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपने रद्द केल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. सभा सुरू असताना स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी डॉ. बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर त्यापैकी काही जणांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ. पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *