भोपाळ । मालेगांव बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर साध्वी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. यानंतर भोपाळमधील भाजपा कार्यालयात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नेता प्रभात झा आणि रामलाल सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *