अमेठी । राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालानंतर स्पष्ट होतं की, चोकीदारच चोर आहे . तुम्ही म्हणाल तिथे आपण देशासाठी १५ मिनिटं चर्चा करू, असे आव्हान राहुल गांधी यांनी केलंं.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंं. यावेळी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महत्वपूर्ण निकालावर प्रतिक्रिया देतना म्हटलं की, राफेल करार प्रकरणी झालेला भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी झाली तर मोदी आणि अनिल अंबानी याचंं पितळ जगासमोर उघडंं होईल. सर्वोच्च न्यायालयानंही मान्य केलं आहे. चोकीदार चोर है !

राफेल लढाऊ विमान खरेदी करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज (बुधवार) केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *